तुकाराम बीज निमित्त चिखलगी भुयार येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन- तुकाराम महाराज यांची माहिती


जत/प्रतिनिधी:-  मंगळवेढा तालुक्यातील चिखलगी भुयार मठ येथे तुकाराम बीज निमित्य प्रतिवर्षाप्रमाणे  विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती व श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी व रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
           शनिवारी हरिनाम गजराने तुकाराम बीज धार्मिक सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. शनिवारी रात्री श्री संत बागडेबाबा महाराज यांचे शिष्य अमृत पाटील महाराज, महादेव हिप्परकर महाराज, युवराज शिंदे महाराज, बसवंत चौगुले महाराज, पात्रे महाराज, तुकाराम महाराज मानेवाडी, शिवराया हत्ताळे महाराज, भारत खांडेकर महाराज, सुखदेव एडवे महाराज, कुलकर्णी महाराज, होनमाने महाराज, म्हातारबा महाराज, सखुबाई नरळे महाराज, राजगुरू महाराज, अशोकबुवा ढगे महाराज, साठे महाराज व त्यानंतर शेवटी हभप तुकाराम बाबा महाराज यांचे किर्तन होणार आहे.
            रविवारी दुपारी बारा वाजता फुले व गुलालाचा कार्यक्रम होणार आहे. तुकाराम बीजच्या या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती व श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments