सोनलगी ता.जत येथे मुलाकडून वडिलांचा खून


जत/प्रतिनिधी:- सोनलगी (ता.जत) येथे वडील दररोज दारु पिऊन शिवीगाळ, दमदाटी व किरकोळ मारहाण करुन पत्नी व मुलासमोर अपमान करतात. म्हणून मुलाने वयोवृद्ध बापाचा खून केला. मयत वयोवृद्धाचे नांव शिवाप्पा चंद्राम पुजारी (वय ७०) असे आहे. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजता  घडली. संशयित आरोपी मल्लीकार्जून शिवाप्पा पुजारी यास उमदी पोलिसांनी अटक केली आहे.
        पूर्व भागातील सोनलगी येथे सिध्दरामेश्वर मंदिराजवळ मयत वयोवृद्ध शिवाप्पा चंद्राम पुजारी हे पत्नी पार्वती समवेत रहातात.तीन मुले विभक्त आहेत. शेती व मजूरीची कामे करतात. मयत शिवाप्पा पुजारी लहान मुलगा मल्लिकार्जुन याच्या शेजारी रहातात. मयत शिवाप्पा यांनी सूनेबरोबर झालेले भांडण मुलगी आंबाव्वा हिला फोनवरुन सांगितली होते. मयत शिवाप्पा पुजारी हे पहाटेच्या वेळी मुलांच्या घराचा दरवाजा वाजविला. त्यावेळी मुलगा मल्लिकार्जुन यांच्या बरोबर वादावादी झाली.
         दररोजच्या भांडणाचा राग मनात धरून त्याला आज जिवंत सोडायचे नाही. असे म्हणून काठीने जबर मारहाण केली. जमिनीवर ढकलून दिले. भिंतीलगत असलेला पत्राचा कोपरावर डोके आपटल्याने जबर दुखापत झाली. कपाळमोक्ष झाला. रक्तश्राव मोठ्या प्रमाणात झाला. मृतदेह घराच्या मोरीजवळ पडला होता. मुलगा लक्ष्मण यांनी बाहेर येऊन पाहिले असता मल्लिकार्जुन हे शिवाप्पा यास घरात घेऊन गेला. आंबाण्णा व लक्ष्मण यांनी नाकाजवळ हात नेऊन पाहिले असता श्वास बंद होता. जागेवरच मृत्यू झाला होता.
        उपसरपंच सिध्दराम बाबासो पाटील यांनी या घटनेची माहिती उमदी पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयाला शवविच्छेदनासाठी पाठविला.
         उमदी पोलिसांनी मयत शिवाप्पा पुजारी यांचे मुले मल्लिकार्जुन, लक्ष्मण व आंबाण्णा यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. तपासात मल्लिकार्जुनने खून केल्याचे निष्पन्न झाले.
        घटनास्थळी उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट दिली. फिर्याद लक्ष्मण शिवाप्पा पुजारी (वय ४५) यांनी दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करीत आहेत.

Post a Comment

0 Comments