अपघातात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमीजत/प्रतिनिधी:- जत-सांगोला राज्य महामार्गावर स्कॉर्पिओ गाडी पलटी होऊन शेगांव गावचे माजी सरपंच रवींद्र शिंदे -पाटील यांचे लहान बंधू किरण शिंदे -पाटील जागीच ठार झाले.
          जतपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सिद्धार्थ पाॅलिटेक्निक काॅलेजजवळ जतहून भरधाव वेगाने येत असलेली स्कॉर्पिओ गाडी पलटी झाली. गाडीतील एकजण ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीस पुढील उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. स्कॉर्पिओ गाडी क्र. MH-20.AN 2241 यातील किरण रामराव पाटील वय वर्षे 35 राहणार शेगाव हे जागीच ठार झाले. मयत किरण रामराव पाटील हे शेगाव गावचे माजी सरपंच रवी पाटील यांचे लहान बंधु तर जखमी सोमनाथ दिनकर बिचुकले (रा. विटा-पारे) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सांगली सिव्हील येथे उपचार चालू आहेत. या घटनेने पाटील कुटुंबावर तसेच संपुर्ण जत तालुक्यात शोककळा पसरली आहे. सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments