मच्छिंद्र ऐनापुरे यांचा शिक्षक बँकेतर्फे सत्कार


जत/प्रतिनिधी : जत तालुक्यातील एकुंडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे यांचा सांगली येथे भावे नाट्यगृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. श्री. ऐनापुरे यांना २०२१-२२ सालातील सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यानिमित्ताने बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिक्षण सभापती आशाताई पाटील, शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर, संध्याराणी देशमुख, शिक्षक बँकेचे अध्यक्ष यु. टी. जाधव, उपाध्यक्ष राजाराम सावंत, शीला यादव, किरण गायकवाड, गीतांजली ठोले पाटील, उर्मिला कवठेकर दयानंद मोरे आदी उपस्थित होते. ऐनापुरे हे पत्रलेखक, साहित्यीक, कथा, कविता असे १५००हून जास्त साहित्य लिहले आहे. त्यांचा आठवीच्या बालभारती पुस्तकात पाठ्यक्रमही आहे. त्यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशनही झाले आहे.

Post a Comment

0 Comments