अन्यथा महिला रस्त्यावर उतरतील | सुस्मिता जाधव राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष


जत/प्रतिनिधी: गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढीने महागाईचा आगडोंब उसळला आहे. प्रपंच चालवणे अवघड झाले आहे. केंद्रातील भाजप सरकारने तात्काळ महागाईला लगाम घालावा अन्यथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत स्वयंपाक बंद आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांनी दिला.
           जत येथील राष्ट्रवादी कार्यालयासमोर राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रातील मोदी सरकारच महागाईस जबाबदार असल्याच्या आरोप यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी केला. 
           जिल्हाध्यक्षा जाधव म्हणाल्या की, दररोजच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे असे असले तरी केंद्रातील मोदी सरकारला त्याचे काहीच देणेघेणे नाही. वाढत्या महागाईला आळा घालण्यास केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. महागाई आवरा अन्यथा राष्ट्रवादीच्या महिला रस्त्यावर उतरून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करतील असा इशारा सौ. जाधव यांनी दिला.
           यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव, युवती जिल्हाध्यक्ष पुजा लाङ, जतच्या महीला तालुका अध्यक्ष गिताताई कोडग, मिनाक्षी अक्की, नयना सोनवणे, प्रतिभा पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते, माजी सभापती सुरेश शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक मन्सुर खतीब, माजी उपसभापती शिवाजी शिंदे, मच्छिंद्र वाघमोडे, विकास लेंगरे, सागर शिनगारे, इम्रान गवंडी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments