योगामुळे आरोग्य सुधारते; सौ.अनुराधा संकपाळ


जत/प्रतिनिधी: प्राचीन काळापासून ते आधुनिक युगापर्यंत भारतात योगअभ्यास केला जात असून माणसाचे शारीरिक व मानसिक आरोग्य यातून सुधारते हे अनेक संशोधनातुन सिद्ध झाल्याचे मत सौ. अनुराधा संकपाळ यांनी व्यक्त केले. त्या राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे बनाळी, ता. जत येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने योगा व आरोग्य या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी अध्यक्ष म्हणून ऋतुजा सावंत उपस्थित होत्या.
           आपल्या अध्यक्षीय भाषणात ऋतुजा सावंत म्हणाल्या की, योगामुळे निश्चितच आपले आरोग्य सुधारते. योग अभ्यास ही भारताची जगाला दिलेली देण आहे. योगाभ्यासामुळे आरोग्य निश्चितच सुधारते, याचा मी अनुभव घेत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रम  अधिकारी डॉ. विजय जाधव, प्रा. पुंडलीक चौधरी, प्रा. तुकाराम सन्नके, डॉ. निर्मला मोरे, राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, स्वयंसेविका व बनाळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नीता जाधव, प्रमुख पाहुण्यांचा परिचय पूजा तेली, सूत्रसंचालन विकास पवार तर आभार मृदुला सावंत यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments