कै. सौ. शांताबाई शिवशंकर आरळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शल्य चिकित्सा सर्जरी विभागाचे उद्घाटन


जत/प्रतिनिधी :- जत तालुक्यात नावलौकिक असणारे कै. सौ. शांताबाई शिवशंकर आरळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जत यांच्या शल्यचिकित्सा सर्जरी विभागाचे उद्घाटन रविवार २० मार्च २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता होणार आहे.
          उद्घाटन म.नि.प्र.श्री. मुरगेंद्र महास्वामीजी (विरक्त मठ, बिरूळ ता.जत) यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती श्री गुरुदेवमूर्ती अप्पय्या महारुद्रय्या (बबलादी मठ) व डॉ. रवींद्र आरळी यांची प्रमुख उपस्थिती होणार आहे.
         अशी माहिती डॉ. अक्षय कायपुरे व डॉ.सौ. शिल्पा कायपुरे यांनी दिली आहे. या हॉस्पिटलमध्ये पोटाचे विकार, आतड्याचे आजार, स्तनातील गाठी, अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल, मुतखड्यातील उपचार, मुळव्याध, भगंदर, फिशर, बद्धकोष्ठता, इत्यादी गुद विकारावर औषधोपचार इंजेक्शन थेरपी, कार्य थेरपी, लेझर व ऑपरेशन द्वारा प्रभावी उपचार उपलब्ध होणार असून जत शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
          तसेच उद्या दिनांक 20 रोजी मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर आरळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments