जिल्हा परिषद शाळेस चंद्रशेन सावंत यांच्याकडून २५ हजाराची पुस्तके भेट


जत/प्रतिनिधी:-  जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जि प  शाळा नंबर 2 मध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी श्री चंद्रशेन सावंत हे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी शाळेसाठी पुस्तके देऊ असे आश्वासन दिले होते. आज प्रत्यक्षात 25 हजाराची पुस्तके देऊन त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात येत आहे.
         सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जितेंद्र डूडी यांच्या संकल्पनेतून 'माझी शाळा आदर्श शाळा' या उपक्रमात शाळेसाठी   ग्रंथालयाची पुस्तके  असणे आवश्यक आहे त्यानुसार जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांचे बंधू श्री चंद्रसेन सावंत यांच्याकडून जि प शाळा नंबर 2 जत ला 25 हजाराची पुस्तक  देणगी देण्यात आलेली आहे.
          या पुस्तकाचे वितरण जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांचे पुत्र श्री धैर्यशील सावंत यांच्या हस्ते जि प शाळा नंबर 2 जत ला देण्यात आले. यावेळी बोलताना  धैर्यशील  सावंत म्हणाले की, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण झाली की भविष्यामध्ये एक चांगला सुजाण नागरिक  व देशाची युवा पिढी निर्माण होईल त्यामुळे मुलांनी दिलेल्या पुस्तकांचे वाचन करून आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी त्याचबरोबर यापुढेही शाळेसाठी  लागणारी अन्य  मदत करू असे आश्वासन दिले 
        या पुस्तक वितरण कार्यक्रमासाठी नगरसेवक राजू यादव, मोहन माने पाटील, संजू हनुमाने, शरद जाधव, वसंत जाधव , सुमित जगधने, बंडू शेख , जैनुद्दीन नदाफ, दिगंबर सावंत, संभाजी कोडग ,संगीता कांबळे, राबिया शेख इत्यादी पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments