जत बार असोसिएशनने मानले माजी आमदार विलासराव जगताप यांचे आभार


जत/प्रतिनिधी:- माजी आमदार विलासराव जगताप यांच्या प्रयत्नातुन जत येथील न्यायालयाच्या नुतन इमारतीसाठी जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागची (क्षेत्र १ हे. २० आर) जिल्हा परिषद सांगली यांचेकडील जागा मा. राज्यपाल सोो, महाराष्ट्र शासन (न्याय खाते) दिवाणी व फौजदारी न्यायालय जत यांना देणेकरीता प्रयत्न केल्यामुळे सदरील जागा न्याया खात्यास मिळालेली आहे. व त्या जागेवरती नवीन इमारतीचा प्रस्ताव मा. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडुन मंत्रालयकडे पाठवून दिला होता. त्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, रु ३९ कोटी ४९ लाख इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
          यावेळी बोलताना जत बार असोसिएशनचे अध्यक्ष रणधीर कदम म्हणाले की, जत न्यायालया मधील जागे अभावी कामास होणारा विलंब व न्यायालयांची अपुरी संख्या व त्यामुळे पक्षकारांचे होणारे हाल व अनेक समस्या पुर्णपणे सुटणार आहेत. माजी आ. विलासराव जगताप यांच्या प्रयत्नाबद्दल जत वकील संघटने कडून आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.
          यावेळी जत बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. रणधीर कदम, उपाध्यक्ष अँड. ए. जी. रेऊर, अँड. सचिन पाटील, अँड. ईश्वर हादीमनी, अँड. रमेश मुंडेचा, अँड. वज्रवाड, अँड. टी. बी. साळुंखे, अँड. विजय देसाई, अँड. वैभव भोसले आदीजन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments