जत तालुक्यातील सोरडी येथे शाळेच्या छताचे प्लॅस्टर कोसळले; विद्यार्थी किरकोळ जखमी

संबंधित ठेकेदार, शाखा अभियंता व अधिकाऱ्यांच्यावर कारवाईची मागणी 


जत/प्रतिनिधी : तालुक्यातील सोरडी येथे शाळेच्या छताचे प्लॅस्टर कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता घडली त्यामध्ये एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आराध्य आरुण आभ्यागे (वय ७) असे आहे.
          याबाबत माहिती अशी की, सोरडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता १ ते ७ वी पर्यंतचे ७ वर्ग भरतात. इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या स्लॅबचा सीलिंगचा काही भाग बेंचच्या पुढील बाजूवर पडला. यात एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. नशीब बलवत्तर म्हणून प्लास्टर बेंचच्या पुढील बाजूस पडल्याने सुदैवाने विद्यार्थ्यांना मोठी इजा झाली नाही. दरम्यान, प्रसंगावधान दाखवत शिक्षकाने विद्यार्थ्यांना तत्काळ व्हरांड्यात जाण्यास सांगितले.
          घटनास्थळी संरपच दत्तात्रय चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू वाक्से, माजी संरपच गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने दाखल झाले, हा प्रकार निकृष्ट बांधकामामुळे घडला आहे. असा आरोप करत संबंधित ठेकेदार, शाखा अभियंता व अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी पालक वर्गाने केली आहे.

Post a Comment

0 Comments