म्हैशाळ योजना कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईन कामासाठी २२० कोटी ८१ लाखांचे निविदा प्रसिध्द; आमदार विक्रमसिंह सावंत


जत/प्रतिनिधी:- जत तालुक्यातील अपूर्ण असणाऱ्या शेतीच्या पाण्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी वेळो वेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन व  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ना.जयंत पाटील व ना. विश्वजित कदम यांच्या कडे केलेल्या पाठपुरावा मुळे ६० ते ७० गावांच्या शेतीच्या पाण्याच्या योजना मार्गी लागत आहेत.
          जत तालुक्यामध्ये म्हैशाळ योजना कालव्यांचे बंदिस्त पाईपलाईनचे अपूर्ण असणारे कामे अनेक वर्षापासून प्रलंबित होते. म्हैशाळ उपसासिंचन योजनेतून जत तालुक्यामध्ये जत कालवा कि.मी. १ ते २५ या कामासाठी २१ कोटी १७ लाख इतकी रक्कम व क्षेत्र ४८१५, जत कालवा कि.मी.२६ ते ५२ या कामासाठी  ३२ कोटी ३६ लाख इतकी रक्कम व क्षेत्र ४९३६,जत कालवा कि.मी ५३ ते ८१ या कामासाठी १६ कोटी ७९ लाख इतकी रक्कम व क्षेत्र ४३७६ ,जत शाखा कालवा या कामासाठी ३६ कोटी ८५ लाख इतकी रक्कम व क्षेत्र १०५८३,देवनाळ १ ,२ या साठी ३० कोटी २७ लाख इतकी रक्कम व क्षेत्र ७५०६, देवनाळ विस्तारित २२ कोटी ३१ लाख इतकी रक्कम व क्षेत्र ७७०७,अंतराळ सिंगणहळळी बनाळी शेगाव या साठी २० कोटी ७४ लाख इतकी रक्कम व क्षेत्र ५१६० ,बिळूर १,२ यासाठी २१ कोटी १३ लाख व क्षेत्र ३१७७ ,मिरवाड यासाठी १९ कोटी १५ लाख व क्षेत्र ३७६९ अशा एकूण कामांसाठी २२० कोटी ८१ लाख इतका निधी व ५२०२५ हेक्टर आर क्षेत्रावर कामे होणार आहेत.
          बंदिस्त नलीकेद्वारे लाभक्षेत्राची विकास कामे करण्यासाठी पाच वर्षे कालावधी देखभाल दुरुस्ती व यशस्वी परिचलन करणे या कामासाठी आ.विक्रमसिंह सावंत यांनी स्वतः अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , ना.जयंत पाटील व ना.डॉ.विश्वजित कदम यांच्याकडे पाठपुरावा करून २२० कोटी ८१ लाख निधी मंजूर करून घेतला आहे. व त्याची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच कामे हि निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुरु केली जातील या कामामुळे जत तालुक्यातील ६० ते ७० गावातील शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार असल्याने शेतकरी आनंद व्यक्त करीत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आ. विक्रमसिंह सावंत यांनी जान्तेला दिलेल्या अश्वसनाची पूर्तता करीत असल्याने जत तालुक्यातील जनता समाधान व्यक्त करीत आहेत.
           यावेळी आ.विक्रमसिंह सावंत म्हणाले कि यापुढेही जत तालुक्यामध्ये विविध विकासकामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ना.जयंत पाटील साहेब व ना. विश्वजित कदम यांच्याकडून भरघोस निधी उपलब्ध केला जाईल.

Post a Comment

0 Comments