जत येथील मनुश्री महिला बहुउद्देशिय विकास मंडळाच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा


जत/प्रतिनिधी:- आजची स्री ही प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरीबरीने कामात अग्रेसर असून आताची स्री ही अबला नसून सबला असल्याचे तीने प्रत्येक गोष्टीतून दाखवून दिले आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा व माजी जि.प.सदस्या सौ. मिनाक्षीताई अक्की यानी केले आहे. 
          जत येथील मनुश्री महिला बहुउद्देशिय विकास मंडळ जत यांच्यावतीने महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या सौ. स्नेहलता जाधव या उपस्थित होत्या. यावेळी बोलताना सौ.मिनाक्षीताई अक्की म्हणाल्या की, स्रीयांच्या अनेक प्रकारच्या समस्या असतात पण या समस्या मांडण्याचे धाडस स्रीया करित नाहीत. स्रीयानी आपल्या समस्या घेऊन आमच्याकडे यावे आम्ही त्या सोडवू असेही सौ.अक्की म्हणाल्या. महिला बचतगटाच्या माध्यमातून स्रियांनी एकत्र येऊन बचतगट स्थापन करून छोटे मोठे व्यवसाय उभे करावेत व आपल्या पायावर उभे रहावे यासाठी जी काही मदत व सहकार्य लागेल ते करण्याचे अश्वासन ही सौ.मिनाक्षीताई अक्की यानी दिले.  
         या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जि.प.सदस्या  सौ. स्नेहलता जाधव म्हणाल्या की, स्रीयांनी कोणत्याही संकटाचा सामना एकत्रीत येऊन केला पाहिजे. त्यानी दाखवून दिले पाहिजे की, आजची स्त्री ही अबला नसून ती सबला आहे. प्रत्येक क्षेत्रात ती पुरूषांच्या बरोबरीने काम करित आहे.त्यामुळे स्त्रीला कधिही कमी लेखू नये असेही सौ.जाधव म्हणाल्या. 
           यावेळी महिला मंडळाचे वतीने गरजू महिलांना गृहपयोगी साहित्य, साडी व रोख रककमेची पाकीटे मदत म्हणून वाटण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती राजश्री शिंदे, सौ.प्रमिला साळुंखे, नंदकुमार सुर्यवंशी, भास्कर सोनवने, नेताजी शिंदे, साळुंखे सर आदीनी केले. 
        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेच्या सचिव सौ. नयना सोनावने मॅडम यानी केले,  सूत्रसंचालन संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.नम्रता सुर्यवंशी यानी केले, तर आभार सौ.विमल जाधव यानी मानले.

Post a Comment

0 Comments