महिला दिनानिमित्त जतमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान


जत/प्रतिनिधी:- जत पोलीस ठाणे व उपविभागीय अधिकारी कार्यालय जत येथील वर्षभरामध्ये पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय व विविध गुन्ह्यांत धाडसी कामगिरी बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे जत पोलीस ठाण्यात महिला दिनानिमित्त सन्मान-सत्कार करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले व पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
         यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड, पोलीस हवालदार सुनंदा पटकुरे, वहिदा मुंजावर, पोलीस नाईक योगीता ढंगारे, अर्चना खांडेकर, वनिता सकट, सुरेखा मिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल विजया कुंभार, जान्हवी भोये, जस्मीन शेख, विद्या मिरजे, स्वाती कोळेकर, नम्रता गायकवाड आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments