मराठा ओबीसीकरण व खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठींबा व सक्रिय सहभाग; संभाजी ब्रिगेड जत


जत/प्रतिनिधी:- मराठा ओबीसीकरण व खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा व सक्रिय सहभाग दर्शवत संभाजी ब्रिगेड जतच्या वतीने आज 'उपविभागीय कार्यालय जत' येथे निवेदन सादर करण्यात आले. तसेच खासदार संभाजीराजे यांनी सरकार समोर ठेवलेल्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा गांभीर्य पूर्वक विचार करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्यावेळेस उद्भुवणार्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पूर्णपणे शासनाची राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
           निवेदनात म्हटले आहे की, संभाजी  ब्रिगेडची मराठा आरक्षणावर "मराठा ओबीसीकरण हेचं मराठा आरक्षणं" ही गेल्या पंचवीस वर्षांपासूनची मागणी आहे. आणि संभाजी ब्रिगेड या मागणीवरं ठाम आहे. तसेच आगामी काळात संभाजी ब्रिगेड स्वतंत्र लढा उभा करणार आहे. वर्तमान परिस्थिती मध्ये खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकार समोर मराठा समाजाच्या प्रलंबीत मागण्या ठेऊन दि २६ फेब्रुवारी पासून आजाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणं सुरू केले आहे. या मागण्यादेखीलं मराठा समाजासाठी हीतकारकं आहेत. तरी देखील सरकार या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं आहे. म्हणून पुढील मागण्यांसाठी व खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ दि २८ फेब्रुवारी रोजी राज्यभरं आंदोलन करतं आहे.
◆आंदोलनातील प्रमुख मागण्या :-
१) मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण , ओबीसी आरक्षणाचे संरक्षण तसेच ओबीसी सह सर्व जातींची जातनिहाय जनगनणा करणे.
२)सारथी संस्थेला सक्षम निधी व सारथी संस्थेचे सक्षमीकरण करूण सर्व महसूल विभागानुसार सारथी कार्यालय सुरू करणे.सारथी संस्थेवर कुणबी-मराठा समाजातील अभ्यासक व सामाजिक चळवळीचे प्रतिनिधी घेणे.
३) आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ५०० कोटींचा निधी देणे,महामंडळाची कर्ज मर्यदा २५ लाख करणे तसेच,
४)महामंडळावर  संचालकांच्या नियुक्त्या तत्काळ करणे.
५) मराठा आंदोलकांवर दाखलं गुन्हे तत्काळ मागे घेणे.
६) सर्व जिल्ह्यात वसतीगृहे सुरू करणे.
७) आरक्षण रद्द होण्याअगोदर मराठा समाजातील जे विद्यार्थी MPSC व ईतर निवड परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने तत्काळ नियुक्त्या देणे.
८) कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा देवून पिडीत भगिनीला न्याय देणे.
९)छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक मुंबई येथे जमिनीवर ऊभे करणे.
वरील मागण्यांसाठी आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ दि २८ फेब्रुवारी २०२२ रोजीपासून सुरू असलेल्या आंदोलनास संभाजी ब्रिगेड यांचा जाहिर पाठिंबा आहे. तरी मराठा समाजाच्या मागण्या मान्य होण्यासाठी सहानभुतीपूर्वक विचार करावा ही विनंती तसेच शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तिव्र आंदोलन उभे करू अशा इशारा संभाजी ब्रिगेडच्यावतीने देण्यात आले.  
            यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक, जत तालुका अध्यक्ष दिपक पाटणकर, जत शहर अध्यक्ष प्रमोद काटे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments