जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक संपन्न

अश्वारूढ पूतळा शिवजयंतीपूर्वी बसविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेण्याचा निर्णय
जत/प्रतिनिधी:- जत येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात छ. शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ पूतळा दि.१९ फेब्रुवारी शिवजयंतीपूर्वी बसविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची  सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेण्याचा निर्णय आजच्या बैठकित घेण्यात आला. 
         जत येथिल सोनाई मंगल कार्यालयात छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा लवकरात लवकर बसविण्यासाठी जे काय करावे लागणार आहे. ते सर्व करण्याची तयारी आजच्या बैठकित सर्वानुमते मान्य करण्यात आली. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना आजच्या बैठकिचे आयोजक व नगरसेवक विजय ताड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लवकरात लवकर बसविला पाहीजे ही लोकभावना बनली आहे. गेली पंधरा वर्षे झाली या पुतळ्यावरून राजकारण सुरू आहे. हे थांबले पाहिजे व पुतळा बसला पाहीजे. यासाठी सर्व नेतेमंडळी यानी एकत्र आले पाहीजे व सर्वोतोपरी सहकार्य केले पाहिजे असे आवाहन ताड यानी केले. 
          यावेळी आर.पी.आय.जिल्हाध्यक्ष संजय कांबळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अराध्यदैवत असून यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी पुतळा होता. त्याच जागेवर आताचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्र्वारूढ पुतळा बसविण्यात येणार असल्याने त्याला परवानगीची अवश्यकता नाही. तरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसविण्याकामी सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, अनिल शिंदे, रणधिर कदम वकिल, सुनिल चव्हाण, जि.प.सदस्य सरदार पाटील, अनिल पाटील, बसवराज चव्हाण सुजय उर्फ नाना शिंदे, शिवसेना नेते दिनकर पतंगे आदीनी आपले विचार मांडले. 
          आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची व देशाची अस्मिता आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊनच येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती बसविण्यासाठी जे काय करावे लागणार आहे. ते सर्व करण्याची तयारी करावी. यासाठी गट- तट बाजूला ठेवून एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती बसविण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी आम्ही सर्वपक्षिय नेतमंडळींना आवाहन करीत आहोत की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी लवकरात लवकर जिल्हाधिकारी श्री अभिजित चौधरी यांच्या भेटीला सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेण्याचा निर्णय आजच्या बैठकित घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यानी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन ही आ.सावंत यांनी केले. 
          या बैठकीला युवराज निकम, समाधान शिंदे, गणेश गिड्डे, अतुल मोरे, अरूण उर्फ बारू शिंदे, चंद्रसेन सावंत, किरण शिंदे, बाळासाहेब जाधव, मोहन चव्हाण, बंटी दुधाळ, काका शिंदे, श्रेयश नाईक, परशुराम मोरे, सलिम पाचापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments