बदनामीकारक व अर्वाच्य वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांना अटक करा : सुजय शिंदेजत/प्रतिनिधी :- बंडातात्या कराडकर यांनी एका वृत्तवाहिनीवर सातारा येथे वाईन विरोधी आंदोलना दरम्यान अर्वाच्च भाषेत स्वर्गीय पतंगराव कदम व ना. विश्वजित कदम यांच्या कुटुंबाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले आहे. या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सर्व प्रसिद्धी माध्यमातून प्रसारित झाली आहे. याप्रकरणी कराडकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीचे निवेदन जत पोलिस निरीक्षक यांच्याकडे काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय उर्फ नाना शिंदे यांनी दिले आहे.
           सुजय शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा प्रचंड रोष ह्या गोष्टी मुळे निर्माण झाला आहे. कदम कुटुंबीय शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करीत आहे. या कुटुंबाची बदनामी करण्याच्या हेतूने बंडातात्या कराडकर यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. ना. कदम हे राज्याचे नेते असून सहकार व कृषी राज्यमंत्री म्हणून समर्थपणे कार्यभार सांभाळत आहेत व त्यांच्या बद्दल केलेले वक्तव्य त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने केले आहे. यामुळे बंडातात्या कराडकर यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी नाना शिंदे यांनी केली.

Post a Comment

0 Comments