आमदार विक्रमसिंह सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


जत/प्रतिनिधी:- आमदार विक्रमसिंह सावंत यांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जत येथील भारती विद्यापीठ मुलींचे वसतिगृह येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते दिवसभर तळ ठोकून होते. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनीच शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर भारती विद्यापीठ येथे गर्दी केली होती. तसेच यावेळी विविध खात्यातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. वाढदिनी हार, बुके, शाल-श्रीफळ ऐवजी शालेय शैक्षणिक साहित्य भेट देण्याचे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराव बिराजदार, कार्याध्यक्ष सुजय ऊर्फ नाना शिंदे व विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम यांनी केले होते. नवीन वर्षात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांनी हार व बुके न आणता शैक्षणिक साहित्य भेट म्हणून आणले. तसेच वाढदिवसानिमित्त जत येथे कुस्ती, रांगोळी व क्रिकेट स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. 
           यावेळी उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटारे, तहसीलदार जीवन बनसोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले ,पोलीस निरीक्षक उदय डुबल, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, तलाठी रवींद्र घाटके, सरकल संदीप मोरे आदींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
           यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराय बिराजदार, माजी पं. स. सभापती बाबासाहेब तात्या कोडक, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, कार्याध्यक्ष सुजय उर्फ नाना शिंदे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, माजी नगरसेवक परशुराम मोरे, तालुका काँग्रेस सरचिटणीस आशिष शिंदे सरकार, गणेश गिड्डे, समाधान शिंदे यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


आमदार सावंत याना वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, रासपचे संस्थापक महादेवराव जानकर, कर्नाटक राज्याचे माजी मंत्री माननीय आमदार एम बी पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार मोहन शेठ दादा कदम आदी मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments