बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी; पृथ्वीराज चव्हाण सरचिटणीस, सांगली जिल्हा विद्यार्थी कांग्रेसजत/प्रतिनिधी :- ४ फेब्रुवारी रोजी बंडातात्या कराडकर यांनी एका वृत्तवाहिनीवर सातारा येथे आंदोलना दरम्यान अर्वाच्च भाषेत माजी मंत्री स्व. पतंगरावजी कदम व सहकार व कृषी राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांच्या कुटुंबाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले आहे. या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सर्व प्रसिद्धी माध्यमातून प्रसारित झाली आहे. याप्रकरणी कराडकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन पृथ्वीराज चव्हाण सरचिटणीस, सांगली जिल्हा विद्यार्थी कांग्रेस यांनी जत पोलीस ठाण्यास दिले आहे.
         पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ४ फेब्रुवारी रोजी वृत्तवाहिन्यावर बंडातात्या कराडकर या इसमाने साताऱ्यातील एका कार्यक्रमामध्ये अत्यंत अर्वाच्च भाषेत राज्याचे जेष्ठ मंत्री दिवंगत नेते माजी मंत्री स्व. पतंगरावजी कदम व सहकार व कृषी राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांच्या कुटुंबाची बदनामी व अर्वाच्च भाषेत वक्तव्य केले आहे. सदर वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सर्व चित्रवाहिन्यावर तसेच सोशल मिडीयावर प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे आमच्या सोबत सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
         गेली अनेक वर्षे राज्यकीय शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रात उतुंग कामगिरी करणाऱ्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तींबाबत इतक्या अर्वाच्च भाषेत व खालच्या पातळीवर जावून बदनामी करण्याच्या हेतूने सदर वक्तव्य केलेले आहे. सदर तथाकथित बंडातात्या कराडकर यांचे विरुद्ध भारतीय दंड संहितेतील नमूद कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

Post a Comment

0 Comments