जत/प्रतिनिधी:- राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा जत येथे तालुका काँग्रेस कमिटी कडून निषेध व्यक्त करण्यात आला. आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या आदेशानुसार जत तालुका काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी मार्केट कमिटी परिसरात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. नबाब मलिक यांच्या अटकेचा निषेध करीत कारवाईवर संताप व्यक्त केला. केंद्र सरकार हे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सूड उगवण्यासाठी इडीचा वापर करीत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणले जात आहे. यासंदर्भात निषेध करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला आहे.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पराय बिराजदार, जि.म.बँक संचालक सरदार पाटील, माजी पं स सभापती बाबासाहेब कोडग, जि.प सदस्य महादेव पाटील, सांगली जिल्हा ओबीसी सेल्स अध्यक्ष तुकाराम माळी सर, पं स.सदस्य दीघवीजय चाव्हन, मार्केट कमिटी संचालक अभिजीत चव्हाण, नगरसेवक सायेबराव कोळी, नामदेव काळे, माजी नगरसेवक परशुराम मोरे, निलेश बामणे, महादेव कोळी, अशोक बननेनवर, माजी सरपंच मारुती पवार, जत तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष गाणी मुल्ला, फिरोज नदाफ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments