बोगस मतदानप्रकरणी आ. सावंत व नाना शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा;माजी आ.विलासराव जगतापजत/प्रतिनिधी:- काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बोगस मतदान केल्याप्रकरणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे व आमदार विक्रमसिंह सावंत हे सुसलाद सर्व सेवा सोसायटीचे थकबाकीदार असताना ते निवडणुकीला उभे राहिले होते. व पराभूत झाले त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
          जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुजय शिंदे यांनी दोन संस्थेमध्ये मतदान केले आहे. त्यापैकी संखं फर्मिंग संस्था बंद आहे. तसेच जत तालुका खरेदी विक्री संघ बंद आहे .व तसेच राजाराम सामुदायिक संस्था विसर्जित झाली आहे. त्याची चौकशी चालू आहे त्या संस्थेने बँकेला अ गटातील उमेदवाराला सुजय शिंदे यांनी मतदान केले आहे . त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावे. तसे ठराव देणाऱ्या सूचक अनुमोदक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आमदार विक्रम सावंत त्यांच्या अर्जाची छाननी का केलं नाही याची तपासणी करून संबंधित संस्थेवर ती कारवाई करावी. व ठरावाची ज्यांनी छाननी केली नाही त्यांच्यावर व तसेच आमदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत माजी आमदार विलासराव जगताप यांनी पूर्वी राजाराम सामुदायिक संस्था लि को बोबलाद मधील तक्रारी संबंधी डी डी आर नीलकंठ खरे यांनी चुकीचा अहवाल सहकारमंत्र्यांच्या दबाव खाली दिले आहेत. त्याची चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments