विलासराव जगताप यांचे आरोप बिनबुडाचे; आमदार विक्रमसिंह सावंतजत/प्रतिनिधी:- माजी आमदार विलासराव जगताप हे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मि ३५ लाखाचे कर्ज काढले आहे. सध्या हे खाते चालू आहे. या लोकांना थकबाकीदार आणि एन पी यातील फरकसुद्धा कळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. असा आरोप आमदार सावंत यांनी आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना केला.    
         आमदार विक्रमसिंह सावंत पुढे म्हणाले की, आपल्यावर आमदार म्हणून जबाबदारी दिल्यानंतर  वेगवेगळ्या खात्यातून निधी आणून विकास करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आडोशाने राजकारण करण्यापेक्षा विकासात्मक राजकारण करावे. टीकात्मक राजकारण करणार्या मंडळींनी स्वतचे आत्मपरीक्षण करावे चुकीची भूमिका मांडणाऱ्या या मंडळीच्या भूलथापांना जनता आता बळी पडणार नाही.  
        डीसीसी बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांची अंडी पिल्ली आपण बाहेर काढणारच आहे. त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशाराही आमदार सावंत यांनी यावेळी दिला.
         यावेळी जिल्हा बँक संचालक सरदार पाटील, जिप सदस्य महादेव पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माझी सभापती बाबासाहेब कोडग, माजी नगरसेवक परशुराम मोरे इत्यादी प्रमुख मंडळी सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments