स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत रस्त्यासाठी तीन कोटी रुपयांची कामे मंजूर; आमदार विक्रमसिंह सावंत


जत:प्रतिनिधी:- जत तालुक्यातील रस्त्यासाठी, सामाजिक सभागृह व इतर विकास कामासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत तीन कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. कोरोनाच्या महामारीत सुद्धा महाआघाडी सरकारने तालुक्यासाठी मोठा निधी दिला आहे. यापुढील काळातही आणखी निधी आणून जत तालुक्याचा विकास करू अशी माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली. 
           वाळेखिंडी येथील जाधववाडी रस्ता ते कृष्णा नगर एक किलोमीटर रस्त्यासाठी ५ लाख रुपये. बालगाव कर्नाटक बॉर्डरपासून मारुती मोरे वस्ती पर्यंत रस्ता खडीकरण मुरमिकरणसाठी ११ लाख रुपये, वाशाण येथील व्हनमेश्वर मंदिरासमोरील सभामंडपसाठी ७ लाख रुपये, बेवनुर येथील काळेलवस्ती भागात सभामंडपसाठी ७ लाख रुपये, उमराणी भागातील पांढरेवाडी ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडपसाठी ७ लाख रुपये, रावळगुंडवाडी महादेव मंदिरासमोर ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडपसाठी ७ लाख रुपये, कोळगिरी जतकडे तलाव मार्गे जाणाऱ्या २ किलोमीटर  रस्त्यासाठी १० लाख रुपये.जालीहाळ बु. येथील स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता व स्मशान भूमीस संरक्षण भिंत बांधकामासाठी १० लाख रुपये, भिवर्गी दुंडी सिद्ध देवस्थान मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपये, माडग्याळ मल्लिकार्जुन मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सामाजिक सभागृह  बांधणे १० लाख रुपयांचा निधी. प्रतापूर महमुलाल शेख वस्ती ते प्रतापूर गावठाण पर्यंत खडीकरण व मुरमीकरण या  २ कि.मी. रस्त्यासाठी १० लाख रुपये. डफळापूर मरगुबाई मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधणे. ७ लाख रुपये. सिंगनहळळी ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी १५ लाख रुपये.
हिवरे येथील बिरोबा मंदिर परिसरात ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपये, साळमळगेवाडी टेकडी वरील महालिंगराया मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपये. वज्रवाड ते मलाबाद रस्ता खडीकरण मुरमीकरण करणासाठी १० लाख रुपये. रावळगुंडवाडी बिळूर रस्ता रावळगुंडवाडी ते हिरगौंड वस्ती शाळेपर्यंत मुरमिकरणसाठी १० लाख रुपये. भिवर्गी येथील दुधाळ वस्ती येथे एस.टी.पिकअप शेड बांधकामासाठी ४ लाख रुपये. उमदी  येथील अंबिका मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप  बांधकामासाठी १० लाख रुपये मंजूर आहेत.
         काराजनगी सिद्धेश्वर मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपये. बसर्गी येथीळ बसर्गी ते अडळट्टी रस्ता मुरमीकरनासाठी ७ लाख रुपये. येळवी ओंकारस्वरूपा ज्यू.कॉलेज येळवी येथे एस.टी.पिकअप शेड बांधकामासाठी ४ लाख रुपये. गोंधळेवाडी येथील  ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी १५ लाख रुपये. लकडेवाडी येथे ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी १५ लाख रुपये. गुगवाड ते बिळूर मधील  (मडदाळ वस्ती रस्ता) दोन किलोमीटर रस्ता खडीकरण मुरमिकरण १० लाख रुपये. माणिकनाळ येथील विरभद्र मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपये. दरीबडची संख रोड ते मजार माळी वस्ती पर्यंतच्या १.५ की.मी. रस्ता मुरमीकरण व खडीकरणसाठी ७ लाख रुपये. वाळेखिंडी डोंगरगाव रस्ता ते निंबाळकर वस्ती मुरमीकरण करणासाठी ७ लाख रुपये. जाडरबोबलाद येथील बिरोबा मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपये. मोटेवाडी (को.बोबलाद) येथील विठ्ठलमंदिर परिसरातील  ग्रामपंचायत जागेत सभामंडप बांधकामासाठी ७ लाख रुपये. लोहगाव येथील चव्हाण मळा येथील ग्रामपंचायत  जागेत सभामंडपसाठी ७ लाख रुपये. येळदरी ते मेंढीगिरी रस्ता मुरमिकरनासाठी १० लाख रुपये.धुळकरवाडी  येथील माळी वस्ती येथे बसवेश्वर मंदिर परिसरातील सभामंडपसाठी  ७ लाख रुपये. उमदी येथील दलित वस्ती  मधील समाज मंदिराची दुरुस्तीसाठी ८ लाख रुपये. निगडी खुर्द येथील जंगल वस्ती दर्ग्याजवळ एस.टी. पिक अप शेड बांधकामासाठी ४ लाख रुपये. जत येथील  शिवाजी पेठ चर्मकार समाज विठ्ठलमंदिर सामाजिक सभागृह बांधकामासाठी १० लाख रुपये. इत्यादी कामांसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सावंत यांनी दिली.

Post a Comment

0 Comments