आ. सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त बेवनूर येथे शालेय विद्यार्थ्यांना मास्कचे वाटपजत/प्रतिनिधी:-  आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त बेवनूर ता.जत येथे शिवबाराजे फौंऊंडेशन व स्व. बी. आर. (दादा) नाईक सोशल फौंऊंडेशन यांचे वतीने प्रगती विद्यामंदिर बेवनूर व जि.प. प्राथमिक शाळा बेवनूर येथे सर्व विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. आमदार सावंत यांनी हार, तुरे याना फाटा देत अगदी साधेपणाने तसेच शालेय साहित्याचे वाटप, गरजुंना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याच पध्दतीने संपूर्ण तालुक्यामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. अशाच पध्दतीने सामाजिक कार्य करण्यासाठी शिवबाराजे फौंऊंडेशन व बी.आर.(दादा)नाईक सोशल फौंऊंडेशन यांचा पुढाकार असतो. यावेळी शिवबाराजे फौंऊंडेशन चे अध्यक्ष संतोष तुकाराम नाईक, संचालक विजयकुमार वसंतराव नाईक, बी.आर(दादा) नाईक सोशल फौंऊंडेशन चे अध्यक्ष श्रेयश नाईक, संचालक संदीप नाईक, उपसरपंच प्रविण वाघमोडे, सोसायटी चे मा. संचालक पिंटू शिंदे , वसंतराव देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments