जत/प्रतिनिधी : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे लोकप्रिय आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिनी येळवी ता.जत येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्या वाटप करण्यात आले. येळवी येथील जिल्हा परिषद शाळा, अहिल्यानगर येथील जिल्हा परिषद शाळा व रानमळा येथील जिल्हा परिषद शाळा तसेच ओंकारस्वरुपा इंग्लिश मीडियम स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. येळवीचे उपसरपंच सुनिल अंकलगी, ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेचे सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, संतोष स्वामी, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश शिंदे, नवनाथ पवार, तुकाराम सुतार, तानाजी व्हनमाने, विक्रांत रूपनर आदी उपस्थित होते.
0 Comments