डॉ.बाबासाहेब आंबेडकर नियोजित उद्यान व स्टेडियम मध्ये लोक वर्गणीतून बोअरचे उदघाटनजत/प्रतिनिधी:- जत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नियोजित उद्यान व स्टेडियम मध्ये लोक वर्गणीतून बोर (हातपंप) चे उदघाटन करण्यात आले. विश्र्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा जत शहरात असावा अशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांची खूप वर्षांपासूनची ईच्छा होती. त्या दृष्टीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायाकडून पुतळ्यासाठी निधिही जमा करण्यात आला आहे. लवकरच हा पुतळा जत येथील नियोजित उद्यानामध्ये बसवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने उद्यान सुशोभीकरणाचे काम गतीने सुरू आहे. याठिकाणी आज बोरचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक (आण्णा) कांबळे, संजयरावजी कांबळे, अतुल कांबळे, संतोष उर्फ भूपेंद्र कांबळे, प्रमोद हिरवे, पदमसिंह उमराणी आदीजन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments