बोगस दाखल्याप्रकरणी अंकलेच्या महिला सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखलजत/प्रतिनिधी:- जत तालुक्यातील अंकले येथील विद्यमान महिला सरपंच संगीता चंदनशिवे यांचे माहेर कवठेमहांकाळ तालुक्यातील आहे. त्यांनी कवठेमहाकांळ तालुक्यातील कुडंलापूर येथील जिल्हा परिषद शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला माहेरच्या नावे म्हणजे संगीता यशवंत करपे या नावे जोडला आहे. याच शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या आधारे त्यांनी जातीचा दाखला काढला व जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली.
           सरपंच संगीता चंदनशिवे यांनी सादर केलेला शाळा सोडल्याचा दाखलाच बोगस असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने कुडंलापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुभद्रा कृष्णदेव पाटील यांनी शाळेच्या नावाचा गैरवापर करून बोगस शाळा सोडल्याचा दाखला तयार करून त्यावरून त्यांनी जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सरपंच संगीता चंदनशिवे उर्फ संगीता करपे यांच्याविरुद्ध कलम ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४ अनव्ये गुन्हा दाखल झाला आहे.
मुख्याध्यापिका सुभद्रा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, अंकले येथील संभाजी चंदनशिवे यांनी माहिती अधिकाराखाली संगीता यशवंत करपे ( रजि. क्रमांक ४१६ ) यांचा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत मिळावी म्हणून अर्ज केला होता, पण ती व्यक्तिगत माहिती असल्याने देण्यात आली नाही. त्यानंतर ढालगाव येथील जिल्हा परिषद सदस्य भगवान वाघमारे यांनी भेट देत संगीता करपे यांचा शाळा सोडल्याची माहिती देण्याबाबत लेखी दिले होते. त्यानुसार ते जि. प. सदस्य असल्याने त्यांना आम्ही माहिती दिली. त्यानंतर कवठेमहांकाळचे गटशिक्षणाधिकारी यांनी माहिती मागवली व वरिष्ठांना अहवाल पाठविला होता. त्यानुसार सांगलीचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या दालनात त्यावर सुनावणी झाली. यात हा प्रकार उजेडात आला. सुनावणीनंतर १३ ऑक्टोबर, २०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगीता करपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संगीता करपे उर्फ सरपंच संगीता चंदनशिवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments