जतच्या सनमडीकर रूग्णालयात सोनोग्राफीची अत्याधुनिक सुविधा; डॉ. सनमडीकर



जत/प्रतिनिधी:- डॉ. सनमडीकर यांचे जत सी.टी. स्कॅन अँड डायग्नोस्टिक सेंटर येथे अत्याधुनिक सोनोग्राफी ची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. कैलास सनमडीकर यांनी दिली. 
           या सुविधेचा प्रारंभ रेडिओलोजिस्ट व सोनोलोजिस्ट म्हणून काम पाहणारे डॉ. रवी जानकर यांचे आई सुषमा जानकर व वडील बिरा जानकर यांच्याहस्ते करण्यात आला. जत परिसरातील रुग्णांना 3 डी व 4 डी गुणवत्ते ची सुविधा पहिल्यांदाच या सेंटर मध्ये सुरू झाली आहे. सोनोग्राफी मध्ये विविध पोटाचे छातीच्या आजारांचे निदान अचूक कळणार आहे. सांधे, कलर डॉपलर व वेगवेगळ्या प्रकारच्या अँजीओग्राफी निदान  सापडणार आहे. सिटी व सोनोग्राफी बायोपसची सेवा सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच गरोदर मातांच्या सोनोग्राफी ची सोय झालेली आहे. यासाठी रेडिओलोजिस्ट व सोनोलोजिस्ट म्हणून काम डॉ. रवी जानकर हे पूर्णवेळ काम पाहणार आहेत. त्यांनी कामकाजास सुरुवात देखील केली आहे. या सोनोग्राफी सुविधेमुळे सांगली, विजापूर, सोलापूर, पुणे व मुंबई येथे जावे लागत होते. आता जत मध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्याने जत तालुकयातील रुग्णांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे. नामांकित फिलिप्स कंपनीची सोनोग्राफी अत्याधुनिक व उच्च तंत्रज्ञान असे जगप्रसिध्द मशीन घेण्यात आले असल्याचे डॉ. सनमडीकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments