तिकोंडी जवळ एकाचा निर्घृण खून; आरोपींना अटकजत/प्रतिनिधी:- जत तालुक्यातील तिकोंडी कागनरी रोडलगत तिकोंडी गावच्या हद्दीत असणाऱ्या तांबेवस्ती येथील एका शेतात रविवार संध्याकाळी 7.30 ते सोमवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 च्या दरम्यान नामदेव लक्ष्मण तांबे (वय वर्षे 45) रा. तांबेवस्ती तिकोंडी (करेवाडी) यांचा काटी व हात्याराने मारहाण करून हत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. याबाबतची फिर्याद मयत व्यक्तीचा मुलगा गणेश नामदेव तांबे यांने उमदी पोलिसात दिली असून उमदीचे साह्याक पोलीस निरिक्षक पंकज पवार यांनी घटनास्थळी भेट देवून तपास केला असता गणेश तांबे यांने दिलेल्या माहिती वरून बबन हणमंत कोळेकर (वय वर्षे 36 ) रा.करेवाडी (को.बोबलाद), बाबू शंकर शेंडगे (वय वर्षे 35 ) रा.तिकोंडी, रामा आप्पाराया बिळूर (वय वर्षे 27) या आरोपींना अटक करून या गुन्ह्यात वापरलेली राखाडी रंगाची चारचाकी कार जप्त करण्यात आली आहे.
          याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत नामदेव तांबे व अरोपी बबन कोळेकर व इतर दोघे हे ऊसतोडणी कामगार पुरवण्याचे काम करत होते. त्यांच्यातील पैशाचे व्यवहार परस्पर मिटवले म्हणून व पैशाच्या देवाण घेवाणीवरून व उसतोडणी टोळीतील कामगार परस्पर पळवतो म्हणून नामदेव तांबे याला गावापासून दूर शेतात गाठून तोंडावर व डोक्यात वस्तूने जबर मारहाण करून खून केला आहे. जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी भेट देवूनतपास करण्याच्या सुचना केल्या आहेत. यापुढील तपास उमदीचे साह्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments