छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरून जिल्हाधिकारी यांचे नियमावर बोट; सर्व त्या परवानग्या मिळवा मगच पुतळ्याची स्थापना कराजत/प्रतिनिधी:- जत येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्र्वारूढ पुतळ्यावरून जिल्हाधिकारी यांचे नियमावर बोट, सर्व त्या परवानग्या मिळवा मगच पुतळ्याची स्थापना करा अशा सुचना. 
         जत येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसविण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्र्वारूढ पुतळ्याचे जत शहरात आगमन झाले असलेतरी हा पूर्णाकृती ब्राॅन्झधातूचा अश्वारूढ पूतळा बसविण्यासाठी माजी आमदार व छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप व विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यामध्ये श्रेयवाद उफाळला आहे. 
          जगताप यांचे म्हणणे आहे की, मी आमदार असताना छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीची स्थापना करून यामध्ये सर्व पक्षाचे, जातीधर्माचे लोक घेऊन लोकवर्गनी गोळा करून मुळचे जत तालुक्यातील असलेले व सद्या मिरजेतील शिल्पकार गजानन सलगर यांना सोळालाख रूपये देऊन आम्ही हा पुतळा आणला असून हा पुतळा बसविण्यासाठी परवानगीची गरज नाही, कारण सन १९५७ साली तत्कालीन केंदीय कृषी मंत्री ना. पंजाबराव देशमुख यांच्याहस्ते या पुतळ्याचे लोकार्पन झाले होते. परंतु पंधरावर्षापूवी झालेल्या अपघातात एका चार चकी वाहनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुत-याची मोठी हानी केल्याने व यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अंशता नुकसान झाल्याने या ठिकाणी असलेला महाराजांचा पुतळा हा श्रीमंत  कै.अनिलराजे डफळे सरकार यानी आपल्या बंगल्यात नेऊन ठेवला होता. सद्या श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांच्या बंगल्यात आहे. त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समिती स्थापन करून हा पूर्णाकृती ब्राॅन्झधातूचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्र्वारूढ पुतळा पूर्वीच्याच जागेवर बसविणार आहोत. या जागेत जत नगरपरिषदेने लाखो रूपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ पूतळा बसविण्यासाठी आर.सी.सी मध्ये  बारा फुट उंचीचा चबुतरा बांधला असून याचे फक्त जिर्णोध्दार करण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपतींचा पुतळा बसविण्यासाठी नविन परवानगीची अवश्यकता नाही. 
      तर विद्यमान आ.विक्रमसिंह सावंत यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे स्थापनेसाठी नविन समिती स्थापन करूनच पुतळयाची स्थापना करण्यात यावी. तसेच पुतळ्याचे स्थापनेसाठी ज्या काही परवानग्या घ्याव्या लागणार आहेत त्या सर्व परवानग्याची पूर्तता करूनच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ पूतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चबुत-यावर बसविण्यात यावा असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुतळ्याचे विरोधकानी राजकारण करू नये असेही आ.सावंत यांचे म्हणणे आहे. 
         आज जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या समोर झालेल्या चर्चेत माजी आमदार 
विलासराव जगताप, खासदार संजयकाका पाटील व आ.विक्रमसिंह सावंत यानी जिल्हाधिकारी यांना आपापली बाजू समजून सांगण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी यांनी तुम्हाला परवानगी शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविता येणार नाही. असे सांगताच खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, तासगाव येथे बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तुमच्या काळातच बसविला असून त्याला तुम्ही नियम लावले नाहीत मग आताच का असा सवाल केला याशर आ.विक्रमसिंह सावंत व खासदार संजयकाका पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. 
         छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दि.१९ फेब्रुवारी शिवजयंतीपूर्वी बसविला जाणार नसल्याने शिवप्रेमी युवक आज दिवसभर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सभोवताली गोळा झालेले दिसून येत होते. पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ पूतळा जेथे आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Post a Comment

0 Comments