आवंढीचे सरपंच आण्णासाहेब कोडग यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार


जत/प्रतिनिधी:- आवंढी गावात गेल्या चार वर्षात सरपंच आण्णासाहेब कोडग व त्यांच्या सहकारी सदस्यांच्या सहकार्याने गावात विविध विकासकामे फार मोठ्या प्रमाणात करण्यात आली. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणलोटचे चार लाख वीस हजार घन मीटर काम, गावात मतदान प्रक्रियेतून दारुबंदी, गावाअंतर्गत रस्ते व गटारी केल्या, शाळा रंगरंगोटी, ग्रामपंचायत नवीन इमारत व कंपाऊंड, वाडीवस्तीवर पाण्याच्या टाक्या अशा अनेक विकासकामांची दखल घेऊन, गेल्या २२ वर्षांपासून सामजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादनी मुंबई या संस्थेने महाराष्ट्र राज्यातून निवड झालेल्या आवंढी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सांगली जिल्हा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ज्येष्ठ साहत्यिक नांदगावकर साहेब, रमेश आव्हाड, प्रकाश सावंत, कीर्तनकार आळंदीकर महाराज यांच्या शुभहस्ते मुंबई येथे देण्यात आला.
         याप्रसंगी आवंढी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण तात्या कोडग, उपसरपंच संजय एडगे, माजी उपरपंच आण्णासाहेब बाबर, विनोद कोडग व राज्यभरातून विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केलेले सत्कार मूर्ती उपस्थित होते.

मी सर्वांचा शतशः ऋणी आहे...
          आवंढी आण्णासाहेब कोडग म्हणाले की, आवंढी गावातील तमाम जनतेच्या, वडीलधाऱ्या मंडळींच्या, माता भगिनींच्या आशिर्वादाने व माझे ग्रामपंचायतीचे उपसरपंच माजी उपसरपंच, सर्व सहकारी सदस्य ग्रामसेवक, ग्रां. प. कर्मचारी, . सोसायटीचे चेअरमन, सर्व सदस्य, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आशा ताई, तसेच सर्व मित्र परिवार प्रशासन यांच्या सहकार्याने गावात गेल्या ४ वर्षात जी विकासकामे करण्यात आली. या सर्व कामाची दाखल घेऊन आज मुंबई येथे मनुष्यबळ लोकसेवा विकास अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार संपूर्ण गावाचा आहे. मी सर्वांचा शतशः ऋणी आहे.

Post a Comment

0 Comments