जत घाटगेवाडी रस्त्याचे काम रखडले; नागरीक त्रस्त; आंदोलनाचा ईशारा


जत/प्रतिनिधी:-  जत शहरातील रामराव नगर येथून जाणारा जत ते घाटगेवाडी हा रस्ता जत नगरपरिषदेचे ८४४३ या योजनेतून मंजूर करण्यात आला असून रस्त्याचे मुरूमीककरण, खडीकरण व डांबरीकरण यासाठी प्रशासनाने तीस लाख रूपये मंजूर केले आहेत. 
          जतचे क्रियाशील आमदार विक्रमसिंह सावंत व जतच्या नगराध्यक्षा सौ शुभांगीताई बन्नेनवर यांनी या रस्त्ते कामाचे उद्घाटन करून सहा महिने होऊन गेले, तरी या रस्त्याचे मुरूमीकरणाशिवाय कोणतेही काम करण्यात आले नाही. अपूर्ण कामामुळे या परिसरात राहाणारे रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे .रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा सुरू असल्याने उडणाऱ्या धुरळ्यामुळे येथिल रहिवाशांना श्वसनाचा त्रास होत असून, अपूर्ण रस्त्यामुळे अपघातही होत आहेत. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंतर्गत सुरू असून या कामाचे ठेकेदार मारूती पवार हे घाटगेवाडी या गावचे असतानाही ते हे काम पूर्ण का करित नाहीत, त्याचप्रमाणे आतापर्यंत सबंधित ठेकेदार यानी केलेले खडीकरणाचे काम ही अत्यंत निकृष्ठ असे झाले असून, आताच रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. उर्वरित या रस्त्याचे काम सबंधित कामाचे ठेकेदार हे कधी सुरू करणार असा सवाल या परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. 
          सबंधित ठेकेदारानी हे काम लवकर सुरू केले नाही, तर या कामाच्या पुर्ततेसाठी तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा येथिल सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, माजी नगरसेविका सौ. बेबीताई चव्हाण, सौ.शारदा कुंभार व या परिसरातील रहिवाशानी दिला आहे.

Post a Comment

0 Comments