जत पश्चिम भागातील तरस या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी; येत्या ३ फेब्रुवारी रोजी रास्तारोको; कॉ. हनुमंत कोळीजत/प्रतिनिधी:- जत पश्चिम भागात गेल्या दोन महिन्यापासून तरस या जंगली प्राण्यांच्या टोळीने, धुडगूस घातला आहे. यामध्ये तरसांनी पाळीव प्राण्यांसह मानवांवर्ती हल्ले केले आहेत. वन विभागाने या टोळीचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी कॉम्रेड हनुमंत कोळी यांनी निवेदनाद्वारे वनविभाग जत व पोलिस प्रशासनाला केली आहे. अन्यथा येत्या ३ फेब्रुवारी रोजी डफळापूर ता.जत येथे रास्ता रोको करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
          जत पश्चिम भागात गेले दोन महिणे तरस या जंगली प्राण्यांच्या टोळीने धुडगूस घातला असून, लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. दरम्यान तरसाच्या टोळीने तालुक्यातील बेळुंखी, बाज, अंकले या परिसरात माणवांसह जनावरांच्या वर हल्ला केला आहे. यामध्ये एक कुत्रा, घोड्याचे शिंगरु ठार झाले आहे. तसेच बाज येथील पुतळाबाई नामदेव वाघमोडे वय ६५ या महिलेच्या पोटाला तरसाने चावा घेतला आहे. तसेच बेंळुखी नजीक एक तरस मयत झाला आहे. याबाबत ठिक ठिकाणी वनविभागाने पंचनामे केले असून, परंतु या तरसाच्या टोळीचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने कोणतेही ठोस पाऊले उचली गेली नाहीत. संबंधित विभागाने तरसाच्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा डफळापूर बस स्टैंड जवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉम्रेड हनुमंत कोळी यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments