जत भूमिअभिलेख कार्यालयाच्यावतीने एक्स सर्व्हिसमन वेलफेअर असोसिएशन जतच्या माजी सैनिकांचा प्रजासत्ताकदिनी सन्मान


जत/प्रतिनिधी:-  ७३ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येथिल भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक सुनिल लाळे यानी जत तालुक्यातील माजी सैनिकांना जत भूमिअभिलेख कार्यालयाचेवतीने अमंत्रीत केले होते. जत तालुक्यातील एक्स सर्व्हिसमन वेलफेअर असोसिएशन जतचे अध्यक्ष सुभेदार दत्तात्रय शिंदे, उपाध्यक्ष ऑन. कॅप्टन बबनराव कोळी, हवालदार महेशराव जगताप, सचिव हवालदार बाळासाहेब भोसले, खजिनदार हवालदार विजय पवार, हवालदार दत्तात्रय शिंदे यानी जत तालुक्यातील माजी सैनिकांना एकत्र करून माजी सैनिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी या वेलफेअर असोसिएशन ची स्थापना केली आहे.

       आज जत येथिल भूमिअभिलेख कार्यालयाचेवतीने उपअधीक्षक सुनिल लाळे व त्यांचे सहकारी यानी भव्य असा मंडप उभा करून  देशसेवेसाठी आपले योगदान दिलेल्या भारतमातेच्या पुत्रांचा यथोचित सन्मान केला. सर्व माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ देवून सन्मान केला. माजी सैनिकाबरोबरच देशसेवेसाठी ज्या महिला भगिनीनी आपले सर्वस्व देशाला अर्पण केले अशा विर पत्नींचाही शाल, श्रीफळ व साडीचोळी देऊन सन्मान केला. 

          यावेळी सुनिल लाळे यानी वेलफेअर असोसिएशन च्या सर्व पदाधिकारी व सभासद याना कार्यालय आवारात सन्मानित करून माजी सैनिकांची भूमिअभिलेख कार्यालयाकडे जी कामे असतील ती प्राधान्याने करू असे अश्वासन दिले. माजी सैनिक हे देशाची आण, बाण आणि शान असून त्यानी देशासाठी जे योगदान दिले आहे. ते आपण कधिही विसरू शकणार नाही. यापुढेही माजी सैनिकांसाठी जी काही मदत व सहकार्य लागेल ते सर्व करण्याचेही आश्वासन लाळे यानी दिले. 

           यावेळी बोलताना एक्स सर्व्हिसमन वेलफेअर  असोसिएशन जतचे अध्यक्ष सुभेदार दत्तात्रय शिंदे म्हणाले की, आम्ही माजी सैनिकांच्या विविध समस्या व अडचणीची सोडवणूक करण्यासाठी या वेलफेअर असोसिएशन ची स्थापना केली आहे. आज जतचे भूमिअभिलेख उपअधीक्षक सुनिल लाळे यानी आम्हाला भारतीय प्रजासत्ताक दिनी आमंत्रित करून आमचा जो मानसन्मान केला आहे. ते खरोखरच प्रशंसनिय आहे. लाळेसाहेबानी आम्हाला आमची जी काही सबंधित कार्यालयाकडील कामे आहेत. ती प्राधान्याने करण्याचे अश्वासन दिले आहे. त्याबद्दल  त्यांना धन्यवाद, त्यानी आजचा हा कार्यक्रम आयोजित करून आम्हाला नविन प्रेरणा देण्याचे काम केले आहे. भारतमातेच्या रक्षणासाठी सिमेवर आपले सैनिक हाडेगोठविणारे थंडीत ही आपल्यासाठी अहोरात्र पहारा देत आहेत. त्यांचे कुटुंब त्यांच्याबरोबर नाही. आपण त्यांच्या कुटुंबाला आधार दिला पाहीजे, असे आवाहन करून ज्या ज्या वेळी आमची मदत लागेल त्यावेळी आम्ही सज्ज आहोत असेही सुभेदार शिंदे म्हणाले. 

          यावेळी जत भूमिअभिलेख कार्यालयांच्यातीने उपस्थित सर्व माजीसैनिकांना व त्यांच्या विरपत्नींना अल्पोपहार देण्यात आला. यावेळी जत येथिल श्रीराम ज्वेलर्स चे मालक दुर्योधन कोडग, शिवसेना नेते शिवाजीराव पडळकर, सांगोला येथिल उद्योगपती भगत, जत एकात्मिक विकास फाऊंडेशनचे सागर शिनगारे त्याच प्रमाणे भूमिअभिलेख कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी वेलफेअर असोसिएशन च्या पदाधिकारी व सभासद यानी संदेशे आते है, हमे तडपाते है या गाण्यावर डान्स करून आपल्या जुन्या आठवणी जाग्या केल्या.


Post a Comment

0 Comments