विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणाकडे वळाने गरजेचे; डॉ. किशोर गायकवाडजत/प्रतिनिधी:- राजे रामराव महाविद्यालय जत येथे आज रोजी एक दिवसीय घरगुती वापरात येणारे रसायन(निरमा पावडर, साबण इ.) तयार करण्याचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन डॉ किशोर गायकवाड राजश्री शाहू कॉलेज कोल्हापूर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ(प्रा) सुरेश पाटील हे होते.
         अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ(प्रा) सुरेश पाटील म्हणाले की, स्वयंरोजगारासाठी कौशल्यनिर्मितीचे अभ्यासक्रम कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. अलीकडे उत्तम तंत्रज्ञ मिळणं दुरापास्त ठरत आहे. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या-स्वयंरोजगाराच्या संधी असूनही अशा नोकऱ्यांपासून वंचित राहण्याची वेळ सुशिक्षित मुलांवर ओढवत आहे. व्यावसायिक शिक्षणामुळे  व्यवसाय कौशल्य प्राप्त होत असल्याने, विविध कंपन्यांमध्ये कुशल कामगारांची गरज भागवता येते. त्याचबरोबर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसायिक शिक्षण घेणे गरजेचे आहे.
          या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे डॉ किशोर गायकवाड बोलताना म्हणाले की,  21 व्या शतकामध्ये विध्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण आत्मसात करावे कारण व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे. यावेळी या प्रशिक्षनामध्ये निरमा पावडर, नीळ, कपड्याचे साबण, फिनाईल व विम बार तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. कृष्णा  रानगर, अंतर्गत गुणवत्ता हामी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ, प्रा. गोविंद साळुंके प्रा. राजेश सावंत कुमारी मेहजबिन मुजावर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments