उमदी ता.जत येथे ठक्कर बंप्पा योजनेतून ५ लाखाचा निधी मंजूर; काँक्रीटीकरण रस्ते कामास सुरुवात


जत/प्रतिनिधी:- उमदी ता.जत येथे पारधी तांडा याठिकाणी अंतर्गत काँक्रीटीकरण रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये पारधी समाजामधील विकास कामासाठी ठक्कर बंप्पा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. याच ठक्कर बंप्पा योजनेतून उमदी येथील पारधी तांडा या ठिकाणी असलेल्या अंतर्गत रस्त्या कॉंक्रिटीकरण करण्यासाठी ५ लाखाचा निधी मंजूर झाला असून काँक्रीट करण्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य राजू कोळगिरी, हणुमंत नाटीकर, गुंडा माने, अक्षय भोसले, भैय्याज खाटीक सह आदी मान्यवर उपस्थित होते.
             
पारधी तांडा या ठिकाणी कॉंक्रिटीकरण रस्त्याचे उद्घाटन काँग्रेस नेते निवृत्ती शिंदे व युवा नेते फिरोज भाई मुल्ला यांच्या विनंतीवरून पारधी समाजातील शाम काळे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.

Post a Comment

0 Comments