जत तालुक्यातील बागेवाडी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेची चौकशी करून दोषींवर कारवाईसाठी राजाराम व्हनमाने यांचे ११ जानेवारीला आमरण उपोषण; तहसीलदारांना निवेदनजत/प्रतिनिधी: बागेवाडी ता.जत येथील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत राबवलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेची जिल्हास्तरीय सक्षम अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करून. या योजनेची बाबनिहाय सविस्तर चौकशी करून दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी. या योजनेत संगनमताने हडप केलेला शासकीय निधी वसूल करावा या मागणीसाठी दि.११ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा बागेवाडी येथील राजाराम व्हनमाने यांनी दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्याकडे दिले आहे.
         निवेदनात म्हटले आहे की, जत तालुक्यातील बागेवाडी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत राबविलेल्या व १२ वाड्या-वस्त्यासाठी नळपाणीपुरवठा योजनेमध्ये संगनमताने खोटी कागदपत्रे दाखवली. योजना मंजूर करुन अंदाज पत्रकाप्रमाणे काम न करता निकृष्ट दर्जाचे अर्धवट स्थितीत काम केले आहे. शासकीय निधी हडपण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सध्या खर्च झालेला शासकीय निधी व प्रत्यक्षात असलेले काम यामध्ये खूप मोठी तफावत आहे. संगनमताने संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांनी शासकीय निधी हडपण्याचा उद्देश ठेवूनच योजना मंजुरीसाठी खोटी कागदपत्रे देऊन योजना मंजूर केली. यामध्ये शासकीय निधीचा खोट्या कागदपत्रांच्या आधारे अपहार केला आहे. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. म्हणून मी जागरूक नागरिक या नात्याने संपूर्ण योजनेची बाबनिहाय अंदाजपत्रक व प्रत्यक्ष कामकाज यांची जिल्हास्तरीय सक्षम अधिकाऱ्यांनी या समितीकडून सखोल चौकशी करावी.
          संबंधित अधिकारी, पदाधिकारी ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच संबंधितांकडून वापर केलेला शासकीय निधी वसूल करावा. व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी दि. ११ जानेवारी रोजी जत पंचायत समिती कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments