मिरवाड सोसायटीच्या चेअरमन पदी यल्लाप्पा तोडकर यांची निवड; आ.सावंत यांच्या हस्ते सत्कारजत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील मिरवाड येथील श्री महालिंगराया विविध कार्यकारी सह. संस्थेच्या चेअरमन पदी यल्लाप्पा तोडकर यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते जत येथे करण्यात आला. 
       यावेळी आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष संजयरावजी कांबळे, माजी सरपंच मारुती पवार, जत मार्केट कमिटी सचिव सोमलिंग चौधरी, काका शिंदे, युवा नेते नाथा पाटील, माजी नगरसेवक महादेव कोळी, जेस्ट नागरीक संघाचे अध्यक्ष चव्हाण सर आदी उपस्थित होते.
        यावेळी आमदार सावंत व उपस्थित सर्वांनी यल्लाप्पा तोडकर याना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments