नवमतदारांमधील जागृतीमुळे भारतीय लोकशाहीला बळकटी मिळेल; तहसीलदार जीवन बनसोडेजत/प्रतिनिधी:- नवमतदारांमधील जागृतीमुळे भारतीय लोकशाहीला बळकटी मिळेल, असा विश्वास तहसीलदार जीवन बनसोडे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राजे रामराव महाविद्यालय जत येथे नवमतदार जनजागृती व विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाच्यावतीने नवमतदार व चांगल्या पद्धतीने काम केलेल्या बीएलओ यांना प्रमाणपत्र देण्यात आले. मतदान कसे करावे याबाबतचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
           राष्ट्रीय मतदारदिनाच्या निमित्ताने अनेक महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, व मतदार नोंदणी विषयक जनजागृती मोहीम झाली. यावेळी मंडल अधिकारी संदीप मोरे, तलाठी रविंद्र घाडगे, कोतवाल सुभाष कोळी, एस. एम. मुलाणी, रियाज शेख, प्रभारी निवडणूक नायब तहसीलदार जी. एल. शेंट्यापगोळ, सागर देसाई, ताजुद्दीन जमखंडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments