बडे थकीत उद्योगपती, कारखानदार यांची वसुली करण्याची हिम्मत प्रकाश जमदाडेंनी करावी : युवक नेते नाथा पाटील

 


जत/प्रतिनिधी: शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या संचालक प्रकाश जमदाडे यांनी शेतक-यांसाठीच काम करावे. स्टेजवर भाषणामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या व बँकेच्या हितासाठी काम करीत आहे. ते स्वतः शेतकरीच असल्याचा मोठा कळवळा आणतात. पण प्रत्यक्षात कृती उलटी करतात. हि दुप्पटी भूमीका बंद करणेची मागणी नाथा पाटील यांनी केली. आमची संचालक प्रकाश जमदाडे यांना एकच विनंती आहे. तुम्ही बँकेच्या हितसाठी काम करीत आहे, हे चांगलेच आहे. तुम्ही जिल्हा बँकेचे थकीत कर्जदार मोठ-मोठे उद्योगपती कारखानदार यांचे अनेक वर्षापासून थकीत असणारे कोट्याधीरुपये वसूल करावेत मगच आपण छोटे छोटे शेतकरी यांनी वेळेत परत फेड करत असलेल्या शेतकऱ्यांच्यावर १०१ सारखी कारवाई करु नये.
         मागील आठवड्यापूर्वी जतमध्ये आपण सोसायटी सचिव व बँक इन्सेंपॅक्टर यांची बैठक घेवून ज्या ज्या गावामध्ये विरोधक आहेत. अशा ठराविक शेतकऱ्यांचीच यादी काढून त्या संबंधातील शेतकऱ्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना तुम्ही राजकीय व्देषातून दिल्या. आमचे तुम्हास एकच आव्हान आहे की, खरोखरच तुम्हाला शेतकऱ्यांचे व बँकेचे हित जोपावयाचे असेल तर आपण कोटयावधी रुपये थकीत असलेल्या बड़े उद्योगपती कारखानदार यांची वसूली करावी आम्ही तुमचा जिल्हातील शेतकऱ्यांच्या वतीने जाहिर सत्कार करु.
          तसे आपण न करता राजकीय व्देषापोटी आपण जे गलिच्छा व घाणेरडे राजकारण करीत आहात. आपले कडील असलेल्या पदाचा गैरवापर करुन अधिकाऱ्यांच्या मार्फत गोरगरिब शेतकऱ्यांचवर अन्याय करीत आहे. तो आपण वेळीच थांबवावा अन्यथा आपणास जशास तसेस उत्तर दिले जाईल.

Post a Comment

0 Comments