ह.भ.प. तुकाराम महाराज यांचा उपक्रम
जत येथील श्री यलम्मा देवी ट्रस्टकडे तुकाराम बाबा महाराज यांनी दहा हजार मास्क, सॅनिटायझर दिले. यावेळी श्री यलम्मा देवी ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे, श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे आदी.
जत/प्रतिनिधी: महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, नवसाला पावणाऱ्या श्री यलम्मा देवीच्या यात्रेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी महानैवेध दाखवण्यात आला. यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते यात्रेत दहा हजाराहून अधिक मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. भाविक, पोलीस, दुकानदार यांना मास्कचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या काळात तुकाराम बाबा महाराज यांनी २०२० मध्ये जत तालुक्यात सर्वात प्रथम प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्याबरोबरच गावोगावी जात शासकीय नियमांचे पालन करत 20 हजाराहून अधिक जणांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. साडेसात हजाराहून अधिक कुटूंबियांना जिवनावश्यक किटचे वाटप केले. लॉक डाऊन काळात तालुक्यातील १२० गावे, वाडी वस्तीवर स्वतः जात बाबांनी २२ हजाराहून अधिक कुटूंबियांना घरपोच भाजीपाला वाटप केला. पैसे व वाहनाअभावी कर्नाटकातून गोंदियाकडे काही तरुण चालत गावी निघाले होते. तुकाराम बाबा महाराज यांनी गोंधळेवाडी येथील त्यांच्या मठात त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली व शासकीय नियमाप्रमाणे त्यांना पास काढून स्वखर्चाने गाडी करून त्यांना त्यांच्या गावी पोच केले.
२०२१ मध्येही तुकाराम बाबांनी आपले समाजकार्य अविरत सुरूच ठेवले. तालुक्यातील साडेतीन हजाराहून अधिक गोरगरीब जनता, गरजवंतांना जिवनावश्यक किटचे वाटप केले. याही वर्षी बाबांनी गावोगावी जात १८ हजाराहून अधिक कुटूंबियांना घरपोच भाजीपाला पोच केला. मिरज व कोल्हापूर जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा कलाकारांच्या मदतीलाही बाबा धावून गेले. लॉक डाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या या कलाकारांच्या घरी जात त्यांना जिवनावश्यक किटचे वाटप केले.
★ गुडडापूर पाठोपाठ जतमध्ये मदत:
गुडडापूर येथील श्री दानम्मा देवीच्या यात्रेत तुकाराम बाबा महाराज यांनी १५ हजाराहून अधिक मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. जत येथील श्री यलम्मा देवीच्या यात्रेत तुकाराम बाबा महाराज यांनी १० हजार मास्क श्री यलम्मा देवी ट्रस्टला दिले तसेच यात्रेतही मास्क व सॅनिटायझर वाटप केले. यावेळी श्री यलम्मा देवी ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे, श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे यांच्यासह मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे,समर्थ राठोड, सागर मोरे,कुमार इंगवले,सोनु राठोळ,दत्ता सावळे उपस्थित होते आदी उपस्थित होते.
■ श्रीमंत डफळे घराण्यान्यानी मानले आभार:
श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोना काळात सर्वसामान्यांसाठी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत या कठीण काळात बाबा जतकरांच्या मदतीला मनापासून धावून आल्याने श्री यलम्मा देवी ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे, श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे यांनी मनापासून आभार मानले.
0 Comments