अनेक भाविक भक्तांच्या उपस्थितीत जतची श्री यल्लामा देवी यात्रा संपन्नजत/प्रतिनिधी: ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर अनेक भाविकांच्या उपस्थितीत जतची श्री. यल्लमादेवी यात्रा पार पडली असून पुढील यात्रा ही १९ डिसेंबर २०२२ ते  दि.२३ डिसेंबर २०२२ रोजी भरणार असल्याचे श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यानी केले जाहीर. 
          महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली व नवसाला पावणारी देवी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या श्री. रेणुका देवी( यल्लमा) चे मूळ ठिकाण हे कर्नाटक राज्यातील सौंदत्ती येथे असून श्रीमंत डफळे राजघराणेचे वंशज हे या देविचे निस्सीम भक्त होते. ते दर पोर्णिमेला घोड्यावरून देविच्या दर्शनासाठी जात होते. श्रीमंत डफळेसरकार यानी जत च्या गंधर्व नदीकाठी श्री. यल्लमादेवी चे मंदिर बांधले आहे. श्री. यल्लमादेवी हे डफळे राजघराणेचे खासगी देवस्थान आहे. त्यामुळे आज देविचे किच कार्यक्रमाचे दिवशी देविचे पुजारी श्री. सुभाष कोळी हे घोड्यावर बसून आपल्या सोबत देविची पालखी व मानाचे झग घेऊन भल्या पहाटे श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्यावर आले होते. या ठिकाणी पालखी आल्यानंतर डफळे राजघराणेचे वंशज व श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे, त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत अमृताराजे डफळे, युवराज श्रीमंत शिवांचलराजे व अनिरुध्द राजे तसेच श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत च्या सचिव मासाहेब श्रीमंत ज्योस्नाराजे डफळे यांनी देविच्या पालखीचे तसेच मानाच्या झगाचे स्वागत केले. 
         पालखी मंदिर परिसरात आल्यानंतर पालखीचे व झगाचे मानकरी तसेच यल्लमादेवी च्या जोगम्मा यानी डोक्यावर झग घेऊन यल्लमादेवी मंदिराच्या पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर देविची पालखी दुपारी सव्वाबारावाजता किचाचे कार्यक्रमाचे ठिकाणी आली. याठिकाणी प्रतिष्ठान चे वतीने आलेल्या भाविक भक्तांना किच कार्यक्रम चांगल्या प्रकारे पहाता यावा यासाठी सभोवती बॅरेकेटींग लावून परिसर बंदिस्त केला होता. जतचे उपविभागीय अधिकारी श्री. रत्नाकर नवले यानी या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 
           यावेळी श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे, जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, राष्ट्रीय काँग्रेस चे कार्याध्यक्ष नाना शिंदे, मानकरी दिलीप तुरेवाले, बाळासाहेब जाधव, पोलीस पाटील मदन माने-पाटील त्याचप्रमाणे यल्लमादेवी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते अनिल शिंदे, गणपतराव कोडग, संग्राम राजेशिर्के, मोहन माने-पाटील, कैलास गायकवाड, मेजर सुनिल चव्हाण, पापा सनदी, चंद्रकांत कोळी, महादेव कोळी, मनोहर कोळी,गणेश सावंत, प्रा.कुमार इंगळे, आदी उपस्थित होते. 
         श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यानी यावेळी प्रसिद्धी पत्रकाव्दारे श्री. यल्लमादेवी च्या पुढील वर्षी भरविण्यात येणारे यात्रेची माहीती दिली. देविची पुढील यात्रा ही  दि.१९ डिसेंबर २०२२ ते दि.२३ डिसेंबर २०२२ या कालावधीत भरणार असून सोमवार दि. १९ रोजी देविच्या गंधोटगी चा कार्यक्रम, मंगळवार दि.२० रोजी देविला नैवेद्य अर्पण करण्याचा कार्यक्रम  तर बुधवार दि.२१ रोजी देविचा किच कार्यक्रम त्यानंतर शुक्रवार दि. २३ रोजी अमावशा अशी पुढील यात्रा भरणार असल्याचे जाहीर केले.

Post a Comment

0 Comments