भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष हटवा भाजपा वाचवा: युवा नेते लक्ष्मण जखगोंड


जॉकेश आदाटे/जत: भाजपचे सांगली जिल्हाअध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना हटवा व भाजपा वाचा अशी टीका जत तालुक्यातील भाजपचे युवा नेते लक्ष्मण जखगोंड यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.
          यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ना.जयंतराव पाटील यांचे सांगली जिल्ह्याचे दोन स्विय सहाय्यक पृथ्वीराज देशमुख व माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत तालुक्यातील भाजपा संपवण्याची सुपारी घेतलेली आहे. तालुक्यातील जातीवादामुळे सरदार पाटील यांच्या सारखा कार्यकत्याला भाजपाने गामावला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जातीवाद केल्यामुळे व राष्ट्रवादी पक्षाने सुपारी घेऊन तमनगौडा रविपाटील यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या बिट हवालदारांना घेऊन तालुकाभर राष्ट्रवादीचा झेंडा मिरवत आहेत. जत नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने उमेदवार न दिल्याने काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. पंचायत समिती सभापती मनोज जगताप हे फक्त मिटींगला तेवढेच उपस्थित असतात, त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवले जात नाहीत. तर रामाण्णा जिवाण्णावर सारख्या कार्यकर्त्याला प्रचंड जातिवादामुळे संधी दिली जात नाही. अशी टीका त्यांनी यावेळी जत येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
           यावेळी अनिल पाटील (बसर्गीकर), बाळासाहेब पांढरे, संजय पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments