जतचे राजाराम सुतार यांना पदार्थविज्ञान विषयातील पीएच.डी. प्रदानजत/प्रतिनिधी :-
      जत येथील राजे रामराव महाविद्यालयात कार्यरत असणारे राजाराम शंकर सुतार यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरकडून पदार्थविज्ञान विषयातील पीएच.डी. हि पदवी गुरुवार, दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी प्राप्त झाली. त्यांना राजे रामराव महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य, पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. ए. के. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. राजाराम सुतार यांनी त्यांच्या पीएच. डी. प्रबंधामध्ये वेगवेगळे नॅनोपार्टिकल्स व पॉलिमरचा वापर करून कमळाच्या पानावर जसे पाणी थांबत नाही तश्या प्रकारचे सुपरहायड्रोफोबिक कोटींग्स काचेवर तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या सुपरहायड्रोफोबिक कोटींग्सवर साचलेली धूळ पाण्याचे साहाय्याने आपोआप स्वच्छ होते. या आपोआप स्वच्छ होणाऱ्या सुपरहायड्रोफोबिक कोटींग्स चा वापर चारचाकी वाहनांच्या काचा सोलार सेल पॅनेल, दारे व खिडकीच्या काचा, कपडे, लाकडी फर्निचर व लोखंडी वस्तूंवर करता येतो. डॉ. राजाराम सुतार यांचे एकूण २२ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत व त्यांचा गूगल स्कॉलर सायटेशन इंडेक्स ६८३ एवढा आहे.               
          २०१४ मध्ये एम. एस्सी. (पदार्थविज्ञान) हि पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे संपादन केल्यानंतर डॉ. राजाराम सुतार यांनी पुणे विद्यापीठ अंतर्गत घेतले जाणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांसाठीची महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा, सेट (पदार्थविज्ञान) १० ऑगस्ट २०१७ रोजी उत्तीर्ण झाले. २०१७ मध्ये प्रा. डॉ. संजय लठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स, टोकियो, जपानला संशोधनकार्यासाठी ३ आठवडे भेट दिली व टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स जपानने आयोजित केलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभाग नोंदविला. त्यांनी राजे रामराव महाविद्यालय, जत येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आणि कार्यशाळेचे सयुंक्त आयोजन केले आहे व १५ हुन जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदविला आहे.डॉ. राजाराम सुतार यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्य शुभांगी गावडे, संस्थेचे प्रशासन सचिव मा. प्रा. डॉ. राजेंद्र शेजवळ, अर्थसचिव मा. प्रा. सीताराम गवळी, मा. श्रीराम साळुंखे, मा. कौस्तुभ गावडे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, राजे रामराव महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश एस. पाटील, पदार्थविज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. ए. के. भोसले, डॉ. श्रीकांत कोकरे, डॉ. संजय लठ्ठे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

1 Comments

  1. Roulette and Betway | Casino Site in Nigeria
    Roulette and luckyclub Betway. Your experience can be a positive or an injustice for our team. You are assured that you will win, right away!

    ReplyDelete