जत येथे उदयक दि. ४ रोजी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन



जत/प्रतिनिधी: मा. डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त व मा. मंत्री डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारती विद्यापीठ वैद्यकीय दंत व नर्सिंग महाविद्यालय व रुग्णालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय विद्यापीठ मुलींचे वस्तीगृह जत येथे दिनांक ४/१/२०२२ रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन रोजी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
          जत तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या संकल्पनेतून या शिबीराचे आयोजित करण्यात आले आहे. तसेच जत वासियांना याचा फायदा घेता यावा या उद्देशाने मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी जत तालुक्यातील जनतेने सर्वाधिक उपस्थिती दाखवून या योजनेचा भरभरून लाभ घ्यावा अशी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यातील नागरिकांना विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments