वज्रवाड ता.जत येथे ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून शाळकरी मुलगा ठारजत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील वज्रवाड येथील राहुल नानासाहेब चिंतामणी (वय १६) या शाळकरी मुलाचा ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. राहुल चिंतामणी हा वज्रवाड हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता तो शाळेच्या गेटबाहेर रस्त्यालगत उभा होता. यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरची त्याला धडक बसली. व तो खाली पडला, राहुल याच्या डोक्यावरून व पायावरून चाक गेल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यु झाला. घटनेनंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरुन पसार झाला. रात्री उशिरा जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने वज्रवाड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments