जत शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक बसवण्याची मागणी; जत नगरपरिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्षजत/प्रतिनिधी:- जत शहरातून जाणारे विजापूर- गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक चांगल्या प्रकारे मार्गी लागण्यासाठी जत नगरपरिषदेने रोड डिव्हायडर बसवावेत अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. 
          यावेळी कांबळे म्हणाले की, विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गाचे नागज फाटा ते मुचंडी हद्दीपर्य॔तचे रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. परंतु जत शहरातून जाणारे विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शहीद सोलनकर चौक ते महात्मा बसवेश्वर चौक या मार्गावर रस्त्याचे मधोमध रस्ता दुभाजक बसविण्याचे काम अद्याप सुरू झाले नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने या मार्गावर रस्ता दुभाजक बसविण्यासाठी रस्त्याचे मधोमध अर्धा मिटर अंतर जागा सोडली आहे. 
        जत शहरातील शहीद सोलनकर चौक ते शेगाव या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचे मधोमध रस्ते दुभाजक बसवून रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. परंतु विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जत शहरातून जाणारे मार्गावर रोड डिव्हायडर बसविण्याचे काम जत नगरपरिषदेचे असून जत नगरपरिषद त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याने या मार्गावर दुचाकी, चारचाकी व अवजड वाहने चालविताना वाहनधारकांना त्रासाचे होत आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने जत शहरातून जाणारे या रस्त्याची कामे नियमबाह्य केल्याने त्यातचे दोन्ही बाजूला असलेल्या गटारीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होऊन लहान मोठे अपघातही होत आहेत. 
         यासाठी जत नगरपरिषदेने या महामार्गावर रस्त्याचे मधोमध रस्ता दुभाजक बसवून वाहतुक व्यवस्था सुरळीत सुरू राहण्यासाठी ताबडतोब काम सुरू करावे अन्यथा तिव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments