जत येथे मंत्री स्व.पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त वही वाटपजत/प्रतिनिधी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व. पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त व कृषीराज्यमंत्री ना. विश्वजीत कदम यांच्या  वाढदिवसानिमित्त विक्रम फौंडेशन जतच्या वतीने जत तालुक्यातील तिल्याळ, असंगी, गोंधलेवाडी, संख, भिवर्गी, मोरबगी, माणिकनाळ, अक्कळवाडी, गिरगाव, लवंगा, गूळगुजनाल, कोणते बोबलाद, कोणबगी, करेवाडी येथे वह्यांचे वाटप आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. 
            यावेळी बोलताना आमदार सावंत म्हणाले की, स्व. पतंगरावजी कदम यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण आहे. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा त्यांनी दारोदारी पोहोचवली. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत ना.विश्वजीत कदम साहेब मार्गक्रमण करीत आहेत. शिक्षणाची विचारधारा आणखी सक्षम करण्यासाठी आज जत तालुक्यामध्ये वही वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, बाबासाहेब कोडग आदीजन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments