लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजराजत/प्रतिनिधी: भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जत येथील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, एक राष्ट्र म्हणून आपण जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करीत आहोत. येणारी पिढी नक्कीच भारताला महासत्ता बनवेल. त्याचबरोबर ती स्वच्छ भारत व राष्ट्रप्रेम या जोरावर देशाचे भविष्य उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले.
          भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असलेले शाळेचे पालक अरविंद शिंदे यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी वर्षभर चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये कुमारी विद्या गावडे व तन्मय पवार यांनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. वेळी शाळेचे व्यवस्थापक डॉक्टर विद्याधर किट्टद, राजेंद्र अरळी, प्राचार्य  विद्या सावंत, मुख्याध्यापिका गीता राठोड, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य बी. एस. माळी, चंद्रकांत गुद्दोडगी, संदीप लोणी, शांतीलाल ओसवाल, महादेव बिरादार, प्रदीप बेल्लोबी सर्व लायन्स क्लब सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचं स्वागत शंकर आरगोडी यांनी केले, सुत्रसंचलन विमल पवार तर आभार प्रदर्शन गीता मंगोजी यांनी केले.

Post a Comment

0 Comments