स्पर्धेच्या युगात आरोग्यदायी जीवनासाठी खेळणे हि काळाची गरज; तहसीलदार जीवन बनसोडेजत/प्रतिनिधी: स्पर्धेच्या युगात शारीरिक व मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी तसेच सांघिक व खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठी मैदानी खेळ खेळणे हि काळाची गरज आहे. असे प्रतिपादन जतचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सांगली जिल्हा विभागीय मैदानी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश पाटील हे होते.
          श्री जीवन बनसोडे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी खेळाला महत्त्व दिले पाहिजे. स्पर्धेत जिंकणार की हारणार हे सहभागी झाल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे निर्भीडपणे स्पर्धेत सहभागी होण्याचे त्यांनी शेवटी आवाहन केले.‌ कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेश पाटील म्हणाले की, राजे रामराव महाविद्यालय जत हे मैदानी खेळात तसेच स्पर्धेचे नीटनेटके आयोजन करण्यात देखील अग्रेसर आहे. या कार्यक्रमावेळी क्रीडा क्षेत्रातील नामवंत क्रीडा प्रशिक्षक व मार्गदर्शक उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. सिद्राम चव्हाण, प्रा. अनुप मुळे व प्रा. दीपक कांबळे यांनी नियोजन केले आहे. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा विभागीय क्रीडा सचिव डॉ. महेश पाटील व विविध महाविद्यालयाचे संघ व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन व सहकार्य होणार आहे. या स्पर्धांमध्ये सांगली जिल्ह्यातील ४९ महाविद्यालयातील ४०० हून अधिक स्पर्धक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. आभार प्रा. दीपक कांबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र लवटे यांनी केले.

Post a Comment

0 Comments