जत येथे ७५ व्या होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न; ५० हुन अधिक जणांनी केले रक्तदान
जत/(जॉकेश आदाटे): जत येथे ७५ व्या होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार विक्रामसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ शुभांगी बन्नेनावर, पोलीस निरीक्षक उदय डुबल, पं.स. सदस्य पिरगोंड माळी, शेगावचे सरपंच, होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी अशोक माळी व तालुक्यातील सर्व होमगार्ड उपस्थित होते.
        यावेळी बोलताना आमदार सावंत म्हणाले की, राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जत येथे ७५ व्या होमगार्ड वर्धापन दिनी येथील होमगार्डच्या पदाधिकाऱ्यांनी राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. अशी रक्तदान शिबिरे मोठ्याप्रमाणात राबवली गेली तरच आपल्याला रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही. तसेच आमदार सावंत यांनी यावेळी होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकारी व मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी ५० हुन अधिक जणांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. यावेळी वृक्षारोपण व स्वच्छता अभियानही राबविण्यात आले.

Post a Comment

0 Comments